*राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरने केली 2 सुवर्णपदकांची कमाई*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरने केली 2 सुवर्णपदकांची कमाई*
तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे दि. 12 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत मोठ्या दिमाखात पार पडली. देशभरातून नागालँड ते तामिळनाडू आणि पंजाब ते आसाम अशा विविध राज्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी गोव्यामध्ये दाखल झाले होते.
रत्नागिरीची सुवर्णकन्या आणी SRK तायक्वांदो संस्थेची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत कायम आपला ठसा उमटवणाऱ्या स्वरा हिने राष्ट्रीय स्पर्धेत ही आपला दबदबा कायम ठेवला. सर्वप्रथम क्युरोगी प्रकारात आक्रमक खेळ करत विरोधी खेळाडूंची धुळधाण उडवत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. तर पुमसे प्रकारात नागालँड च्या मुलीचा पराभव करत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
या स्पर्धेसाठी स्वरा हिने अथक मेहनत घेऊन रत्नागिरीचा झेंडा अटकेपार रोवला. आई साक्षी साखळकर तसेच अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणारे आणि SRK तायक्वांदो क्लब चे मुख्य प्रशिक्षक श्री शाहरुख यांचे स्वरा हिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजपर्यंत स्वरा हिने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणी राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 52 मेडल मिळवली आहेत. स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
तायकॉन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारजगे, महासचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्हा सचिव लक्ष्मण कररा,कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत, क्लब उपाध्यक्ष अमोल सावंत सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य विरेश मयेकर, निखिल सावंत, कांचन काळे यांनी स्वराचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment