150 ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाच्या पुड्या सापडल्या!!!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

150 ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाच्या पुड्या सापडल्या!!!


  रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गस्तीदरम्यान 150 ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थाच्या पुड्या बाळगणाऱ्या इसमावर कारवाई*

*रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई*

रत्नागिरी ---
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्या यांना प्रतिबंध करण्याच्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.

   त्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रत्नागिरी शहरामधील महत्वाच्या ठिकाणी गस्त घालत होती.

   दिनांक 04/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व पथक हे रत्नागिरी शहरामध्ये गस्त घालत असताना 18.15 वाजता रत्नागिरी एम.आय.डी.सी येथील आबूबकर आईस फॅक्टरी शेजारी धामस्कर चिकन शॉप या ठिकाणी एक इसम ब्राऊन हेरोईन घेऊन येणार असल्याचे गोपनीय बातमीच्या आधारे समजले. मिळालेल्या या गोपनीय बातमीच्या आधारे, वरील नमूद ठिकाणी योग्य सापळा रचण्यात आला होता.

  दिनांक 04/12/2024 रोजी 18.15 वा एक इसम बुलेट मोटरसायकलवर बसून हातात एक पिशवी घेवून संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्याला थांबवून त्याची अधिक चौकशी व तपासणी केली असता त्याने आपले नाव अरमान लियाकत धामस्कर राहणार जे. के. फाईल, साईभूमी नगर, रत्नागिरी असे सांगितले व त्याच्या ताब्यातून "150 ब्राऊन हॅटरॉईन अंमली पदार्थाच्या पुड्या" व इतर साहित्य मिळून आलेले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे मिळून आलेला सर्व अमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

   तसेच आरोपीला ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे सदर बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 211/2024 एन.डी.पी.एस अॅक्ट कलम 8 (क), 22(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. 

  ही कारवाई पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/1188 श्री. सुभाष भागणे, स्था.गु.अ.शा, रत्नागिरी, पो.हवा/251 श्री. शांताराम झोरे, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/799श्री. विनोद कदम, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/301 श्री. बाळू पालकर, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/262 श्री. विवेक रसाळ, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी, पो.हवा/265 श्री. योगेश नार्वेकर, स्था.गु.अ.शा., रत्नागिरी व पो.हवा/1408 श्री. योगेश शेट्ये स्था.गु.अ.शा., रत्नागिरी यांनी संयुक्तरीत्या केली आहे.

 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments