*1 डिसेंबर पासून जमीन मोजणीच्या दरांमध्ये वाढ; मोजणीसाठीचा कालावधी 6 महिन्यांवरून 3 महिने*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*1 डिसेंबर पासून जमीन मोजणीच्या दरांमध्ये वाढ; मोजणीसाठीचा कालावधी 6 महिन्यांवरून 3 महिने*  

१ डिसेंबर पासून जमीन मोजणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर जमीन मोजणीसाठीचा कालावधी सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे. आता नियमित आणि द्रुतगती अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळ दोन ठिकाणीच विभागले जाईल.

तर मोजणीची प्रक्रिया केवळ तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली जाणार आहे. या कालमर्यादेमुळे अधिकाऱ्यांवरही मोजणीचे बंधन राहील. मोजणी वेळेत न झाल्यास संबंधितांवर सेवा हक्क कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे भूमिअभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील साध्या मोजणीसाठी पूर्वीच्या दरांमध्ये दुपटीने वाढ करून आता नियमित मोजणी करताना दोन हेक्टरसाठी आता २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर शहरी भागातील शेतजमिनींच्या मोजणीसाठी पूर्वी १० गुंठ्यांसाठी १ हजार द्यावे लागत होते. आता १ हेक्टर अर्थात १०० गुंठ्यांसाठी ३ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

ग्रामीण भागात साध्या मोजणीसाठी पूर्वी २ हेक्टरसाठी १ हजार रुपये द्यावे लागत होते. आता मात्र, २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर त्यापुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी आणखी १ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तर द्रुतगती मोजणी करताना २ हेक्टरसाठी ८ हजार रुपये व त्यापुढील २ हेक्टरसाठी ४ हजार रुपये मोजावे लागतील.

पूर्वीच्या दरांच्या तुलनेत ७ हजारांची बचत होणार आहे. तब्बल १४ वर्षांनंतर मोजणीचे दर वाढविले असले तरी मोजणीचा कालावधी कमी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भूमिअभिलेख विभागाने दिले आहे. पूर्वी साधी, तातडीची, अतितातडीची आणि अति-अतितातडीची अशी चार प्रकारात जमीन मोजणी केली जात होती. त्यामुळे मनुष्यबळ चार ठिकाणी विभागले जात होते. परिणामी मोजणीसाठीचा कालावधी १८० दिवसांचा ठेवण्यात आला होता.


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments