MNS Manifesto : मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; ब्लू प्रिंटच्या अनेक मुद्द्यांचा समावेश, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंनी काय आश्वासने दिली?

 

MNS Manifesto by Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं आहे. ‘आम्ही हे करू’ या नावाने जाहीरनाम्याच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसंच, “आम्ही हे केलं” या पुस्तिकेतून त्यांनी त्यांच्या कामांचा आढावा घेतला.

मनसेच्या चार भागातील जाहीरनाम्यात काय?

राज ठाकरेंनी चार भागात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे.

टिप्पण्या