*वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय अवघ्या एका दिवसांत केला रद्द*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय अवघ्या एका दिवसांत केला रद्द*
राज्याच्या प्रशासनाने वक्फ बोर्डाला प्रशासकीय कामकाजाच्या खर्चासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्याला भाजपाने विरोध केल्यानंतर अवघ्या २४ तासांत हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. काळजीवाहू सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही, या कारणामुळे हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आला आहे.
मुख्य सचिवांनी निर्णय घेतला मागे
राज्याच्या प्रशासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधा आणि बळकटीकरणासाठी 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता. अधिकाऱ्यांनी गुरुवारी, 28 नोव्हेंबर रोजी यासंबंधीचा जीआर जारी केला. त्यावर भाजपाने जोरदार आक्षेप नोंदवला. याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा शासन निर्णय मागे घेतल्याचे सांगितले.
राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नाही. तसेच कोणताही धोरणात्मक निर्णयही घेता येत नाही. असे असतानाही वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. ही प्रशासकीय पातळीवर झालेली एक चूक होती. त्यामुळे ही चूक तत्काळ दुरुस्त करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
अल्पसंख्याक विकास विभागाने वक्फ मंडळाला २८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार १० कोटीचे अनुदान देण्याचा निर्णय घेऊन तसा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला. या निर्णयावर समाज माध्यमातून टीका होऊ लागल्यानंतर भाजपाच्या दबावापोटी प्रशासनाला हा निर्णय रद्द करावा लागला. भाजपा-महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ मंडळाला (Waqf Board) तातडीने १० कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. मात्र भाजपा नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला. वक्फ मंडळाला संविधानात स्थान नाही यावर भाजपा ठाम आहे आणि राहणार, असे भाजपाने एक्स या समाज माध्यमातून स्पष्ट केले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा