*******वंचित चे उमेदवार मोहन भाऊ पुराम यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद ***

*वंचित चे उमेदवार मोहनभाऊ पुराम यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद*
By -दिपक चुनारकर 

         आरमोरी -आरमोरी 67 विधासभेतील मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनभाऊ गणपत पुराम यांचा आरमोरी तालुक्यातील ग्रामीण भागातील कष्टाकरी व श्रमिक बेघर यांच्यासोबत होत असलेल्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
            दौऱ्यानिमित्त होणाऱ्या संवाद यामुळे विधानसभा क्षेत्रातील एक बदलाचे वारे वाहू लागले आहे. मतदार संघात घराणेशाही चे धर्मावर आधारित तसेच एक जातीय राजकारण करणाऱ्या लोकांचा असलेला राग ते मोहन भाऊ पुराम यांच्या जवळ बोलून दाखवीत आहेत.

            मोहनभाऊ पुराम यांनी जोगीसखारा, पळसगाव, वैरागड, मानापूर, देलाणवाडी, मांगदा, सुकाळा, मोहझरी अशा गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वस्त्यांमध्ये लोकांशी घराघरात जाऊन प्रचार सुरु केलेला झंजावात लोकांना त्यांच्याविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.

        SC, ST, OBC च्या वर्गीकरणाच्या प्रश्नावर प्रत्यक्षरित्या आणि विध्यार्थी असतील यांना मोहनभाऊ पुराम आपल्या हक्कासाठी लढणारे वाटतात. त्यामुळे महिला, युवकांसह सामान्य नागरिकही मोहभाऊ पुराम यांच्यासोबत संवाद साधत असून त्यांना विजयाचा विश्वास देत असल्याचे सध्या स्थितीला मतदार संघात चित्र आहे.

Comments