*लिलावात ऋषभ पंत ठरला सर्वांत महागडा खेळाडू*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*लिलावात ऋषभ पंत ठरला सर्वांत महागडा खेळाडू*
आयपीएल मेगा लिलाव २०२५ मध्ये सर्व १२ मार्की खेळाडू विकले गेले. काहींसाठी आरटीएम कार्ड वापरण्यात आले तर काहींना दुस-या फ्रँचायझीकडून मोठी रक्कम देण्यात आली. आयपीएल २०२४ चा विजेता कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघात सामील झाला तर दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार लखनौ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला.
त्याचवेळी गेल्या मोसमात एलएसजीचा कर्णधार असलेला के. एल. राहुल यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. या मोसमात आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरला. पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. संघांनी १२ खेळाडूंवर १८०.५ कोटी रुपये खर्च केले.
ऋषभ पंत या हंगामातीलच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला. या यादीत तिसरे नाव अजूनही मिचेल स्टार्कचे आहे, ज्याला गेल्या वर्षी केकेआरकडून २४.७५ कोटी रुपये मिळाले होते. मात्र, यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. डीसीने त्याला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतले.
मार्की प्लेयरच्या पहिल्या सेटमध्ये अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जने आरटीएमद्वारे १८ कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयस अय्यरलाही पंजाबने विकत घेतले. गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटींना खरेदी केले. ऋषभ पंत लखनौला तर मिचेल स्टार्क दिल्लीत सहभागी झाला. कागिसो रबाडाला गुजरातने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. मार्की प्लेयरच्या दुस-या सेटमध्ये मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने १० कोटींमध्ये विकत घेतले.
डेव्हिड मिलरवर लखनौने ७.५० कोटी रुपये खर्च केले. युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने १८ कोटींना विकत घेतले. मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींना विकत घेतले. लियाम लिव्हिंगस्टोन ८.७५ कोटी रुपयांना आरसीबीमध्ये सामील झाला. के. एल. राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींना विकत घेतले.
भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल पुन्हा लिलावात उतरला होता. ज्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चेन्नईने चहलवर बोली लावायला सुरुवात केली, पण दुस-या टोकाकडून गुजरातनेही चहलसाठी उत्सुकता दाखवली.
तसेच पंजाबनेही चहलला घेण्यासाठी बोली लावली आणि त्याची गुजरातशी टक्कर झाली. त्याचवेळी लखनौनेही उडी घेतली. पंजाबने चहलसाठी १४ कोटींची बोली लावली तेव्हा आरसीबी आणि हैदराबादनेही लिलावात उडी घेतली. अखेर पंजाबने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली. त्यामुळे तो आयपीएल लिलावात विकला गेलेला भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.
*IPL २०२५ मेगा लिलावातील सर्वात महागडे खेळाडू -*
ऋषभ पंत - लखनौ सुपर जायंट्स - रु. २७ कोटी
श्रेयस अय्यर - पंजाब किंग्स - २६.७५ कोटी रु
व्यंकटेश अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स - २३.७५ कोटी रु
अर्शदीप सिंग - पंजाब किंग्स - १८ कोटी रु
युझवेंद्र चहल – पंजाब किंग्स – १८ कोटी रुपये
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा