*सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ!*

  अनुत्पादक कर्जामुळे (एनपीए) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या ११०३ कोटी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या तत्कालीन ३२ संचालकांसह दोन अधिकारी आणि एका सनदी लेखापालावर निश्चित करण्यात आली आहे. निश्चित केलेल्या जबाबदारीप्रमाणे संपूर्ण रकमेची वसुली सर्व दोषींकडून करावी, असा आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हा आदेश निघाल्यामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.*

दोषी ठरविण्यात आलेल्या तत्कालीन संचालकांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, दिलीप माने, जयवंत जगताप आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. 

 यातील दिलीप सोपल (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, बार्शी), आमदार संजय शिंदे (अपक्ष, करमाळा), दीपक साळुंखे-पाटील (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, सांगोला) ही मंडळी विधानसभा निवडणुकीतील बलाढ्य उमेदवार आहेत. चौकशीनंतर निकाल देण्यास ६० दिवसांचा अवधी असताना विधानसभा निवडणुकीतच हा निकाल देण्यात आल्यामुळे त्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले जात आहे.

कारण मालमत्तेपेक्षा जास्त प्रमाणात कर्जवाटप, कर्जवसुलीअभावी अनुत्पादक कर्जामध्ये झालेली वाढ, अनियमितता यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ २०१८ साली बरखास्त करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत बँकेत सहकार खात्याकडून प्रशासकीय कारभार सुरू आहे.

दरम्यान, बँकेच्या आर्थिक नुकसानीची आणि तत्कालीन संचालक मंडळाची चौकशी करण्यासाठी राज्याचे सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. 

  सहकार कायदा १९६० च्या कलम ८८ नुसार डॉ. तोष्णीवाल यांनी चौकशी केली. यात सहा वर्षांनंतर चौकशीअंती बँकेच्या संबंधित तत्कालीन संचालकांसह अधिकारी आणि सनदी लेखापालावर नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यात आली.

नुकसानीचा ठपका ठेवण्यात आलेल्यांमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल (३०.२७ कोटी), दीपक साळुंखे (२०.७२ कोटी), अरुण कापसे (२०.७४ कोटी), अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (१६.९९ कोटी), दिवंगत सहकार नेते सुधाकर परिचारक (११.८४ कोटी), पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे (११.४४ कोटी), दिलीप माने (११.६३ कोटी), सुनंदा बाबर (१०.८४ कोटी), आमदार संजय शिंदे (९.८४ कोटी), दिवंगत माजी आमदार एस. एम. पाटील (८.७१ कोटी), चंद्रकांत गणपतराव देशमुख (८.४१ कोटी), जयवंत जगताप (७.३० कोटी), विजयसिंह मोहिते-पाटील (३.०५ कोटी), आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील ५५.५४ लाख) याप्रमाणे अनुत्पादक कर्जवसुलीसह व्याजआकारणी मिळून एकूण ११०३ कोटींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 

 बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक किसन मोटे व काशिलिंग पाटील, तसेच सनदी लेखापाल संजीव कोठारी यांच्यावर आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवून त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments