वेलगुरचे माजी सरपंच आशन्ना दुधी यांचा राष्ट्रवादीमध्ये ( अजित पवार गट )प्रवेश
वेलगूरचे माजी सरपंच व ना. वि.स.चे. कट्टर कार्यकर्ते आशन्ना दुधी यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम यांचे वेलगुर येथील जुने व राजे विश्वेशराव यांच्या कार्यकाळापासूनचे समर्थक आशन्ना दुधी यांनी रविवारी असंख्य समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून हाताला ‘घडी’ बांधली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी ‘घडी’ चिन्हाचे दुप्पटे टाकून त्यांचे स्वागत केले.
विशेष म्हणजे आशन्ना दुद्दी यांनी स्व.राजे विश्र्वेशरराव महाराज, स्व.राजे सत्यवानराव महाराज यांच्या हयातीत व तालमीत एकनिष्ठेने काम केले. पण अंब्रिशराव महाराजांच्या कार्यपद्धतीने नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) आले. वेलगुर व परिसरात आशन्ना दुधी यांची वेगळी लोकप्रियता असून सामाजिक, राजकीय पकड आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे धर्मराबाबांसाठी या भागात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Post a Comment