*सर्वात तरुण आमदार ठरला आर आर आबांचा लेक रोहित पाटील!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*सर्वात तरुण आमदार ठरला आर आर आबांचा लेक रोहित पाटील!*
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निकालाने अनेकांना आश्चर्य चकित केलंय. बहुतेक एक्झिट पोल फेल ठरले, तर काही मोठ्या नेत्यांवरही घरी बसण्याची वेळ आली. मात्र या ऐतिहासिक निवडणुकीत राज्यात सर्वात तरुण आमदार आर.आर. आबांचा लेक रोहित ठरला आहे.
अवघ्या 25 व्या वर्षी रोहित पाटील हे मोठ्या मताधिक्याने आमदार झाले आहेत. रोहित पाटलांनी एक लाख 26 हजार मत मिळवत दणदणीत विजय मिळवला. रोहित पाटील हे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव आहेत. रोहित पाटलांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर वडिलांच्या वरशाप्रमाणे ते सुद्धा राजकारणात आले. अगदी स्थानिक पातळीपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळाला होता. तेव्हापासूनच यंदाच्या निवडणुकीत रोहित पाटलांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली होती. शरद पवारांनीही जनमत पाहून रोहित पाटलांना उमेदवारी दिली.
1990 पासून तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात पाटील कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. याच मतदारसंघातून आर आर पाटील यांनी सलग दोन वेळा हॅट्रिक केली. त्यांच्या निधनानंतर लाभलेल्या पोटनिवडणुकीत पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयीही झाल्या. 2019 ला पुन्हा सुमन पाटील निवडून आल्या. त्यानंतर आता 2024 ला रोहित पाटील हे विजयी झाले. आर आर पाटलांचे विरोधक मानले जाणारे संजय काका पाटील हेच रोहित पाटलांचे ही विरोधक होते. मात्र संजय पाटलांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करत रोहित पाटलांनी तासगाव मतदारसंघात पाटील घराण्याचं वर्चस्व राखून ठेवलं. निवडून आल्यानंतर हा विजय त्यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांना समर्पित केला.
एकीकडे महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांचे गड ढासळत असताना दुसरीकडे या युवा नेत्याने पहिल्याच प्रयत्नात विधानभवनाचे दार ठोठावलं आहे. रोहित पाटलांना पराभूत करण्यासाठी महायुतीने सर्व शक्य प्रयत्न केले. मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी त्यांचाच नावाचे चक्क तीन अपक्ष उमेदवारही उभे केले. मात्र त्यानंतरही 27 हजारांच्या मताधिक्याने रोहित पाटील निवडून आले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा