*संगमेश्वर तुरळ नाका येथे चिपळूण पोलिसांना हुलकावणी देत गोवा बनावटीची दारू घेऊन फिल्मी स्टाईलने पळून जाणाऱ्याला मुद्देमालसहित घेतले ताब्यात.*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*सविस्तर वृत्त*
*संगमेश्वर तुरळ नाका येथे चिपळूण पोलिसांना हुलकावणी देत गोवा बनावटीची दारू घेऊन फिल्मी स्टाईलने पळून जाणाऱ्याला मुद्देमालसहित घेतले ताब्यात.*


▪️संगमेश्वर पोलिसांनी गोवा बनावटिची दारू वाहतूक करणारी इनोव्हा कार मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे पकडली.इनोव्हा गाडीसह 6.69.920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी चेतक भरत वाळवे वय 29 वर्षे राहणार तिवरे डांबरे, वाळवेवाडी, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सोमवार 25 नोव्हेबर 2024 रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास करण्यात आली.
               
▪️चेतक भरत वाळवे हा त्याच्या ताब्यातील टोयाटो कपंनीची इनोव्हा गाडी क्रमांक MH01/AC/5668 मधून गोवा बनावटीचे दारू असलेले 118 बॉक्स विनापरवाना घेऊन  गोवा येथून मुबंई च्या दिशेने जात असताना त्याला चिपळूण येथे पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता. चालक चेतक भरत वाळवे याने तेथे न थांबता फिल्मी स्टाईल ने तेथून पुन्हा त्याच्या ताब्यात असलेली दारू वाहतूक करणारी इनोव्हा गाडी रत्नागिरी च्या दिशेने  सुसाट वेगात पळ काढताच याची माहिती चिपळूण पोलिसांनी संगमेश्वर पोलिसांना देत त्यांनीही तशाच फिल्मी स्टाईलने त्या गाडीचा पाठलाग सुरु केला व  मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ नाका येथे संगमेश्वर पोलिस तसेच चिपळूण पोलिसांनी अडवत त्याला मुद्देमालसह ताब्यात घेण्याची कामगिरी केली.
       
▪️या गाडीत गोल्डन एसी ब्लु व्हिस्की चे 750 मिली च्या 70 बॉक्स मध्ये 840 बाटल्या,गोल्डन एसी ब्लु व्हिस्की 180 मिली मापाच्या 29 बॉक्स मध्ये 1392 बाटल्या,गोल्ड एन्ड ब्लॅक ×××रम 750मिली च्या 5 बॉक्स मध्ये 60 बाटल्या,गोल्ड एन्ड ब्लॅक ×××रम 180 मिली च्या 14 बॉक्स मध्ये 672 बाटल्या असलेली गोवा बनावटीचे दारू चे बॉक्स व ते विनापरवाना वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली टोयटो कंपनीची इनोव्हा गाडी असा सुमारे 6.69.920 रुपये किमतीचा मुद्देमाल व पोलिसांना हुलकवणी देऊन पळून जाणाऱ्या चेतक वाळवे याला ताब्यात घेण्याची कामगिरी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक (राजू) साळवी,चालक जाधव, पोलीस कॉन्सटेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गाजरे,चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. आर. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल एस. एल. मिसाळ,चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. एच. केतकर यांनी केली.

*💫पोलीस उपनिरीक्षक श्री विवेक (राजू) साळवी. चालक जाधव पोलीस कॉन्स्टेबल रसाळ पोलीस कॉन्स्टेबल गाजरे चिपळूण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एस आर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल ए एस देशमुख पोलीस कॉन्स्टेबल एस एल मिसाळ चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल एम एच केतकर यांनी माननीय पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केलेली आहे*
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या