*व्होट जिहाद फंडिंग आरोप प्रकरणात दोघांना अटक*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*व्होट जिहाद फंडिंग आरोप प्रकरणात दोघांना अटक*    

मालेगावमधील बँकेत बेनामी हवालाद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये पाठविण्यात आले आणि नंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेल्याची बाब समोर आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना अटक झाली आहे. यानंतर आता या प्रकरणी ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

मालेगाव व्होट जिहाद फंडिंग स्कॅम प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद याच्याशी संबंधित २४ हून अधिक ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ईडीकडून ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू आहे. नाशिकमधील मर्कटाईल बँकेतील खात्यांशी संबंधित ही छापेमारी सुरू आहे. आरोपी सिराज मोहम्मदचे २४ बेनामी बँक अकाऊंट मालेगावच्या नाशिक मर्चंट बँक आणि महाराष्ट्र बँकेत सापडले होते.                         

व्होट जिहादच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मालेगाव बँकेत बेहिशोबी १२५ कोटी रुपये आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. १२५ कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा होऊन तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. तर यापूर्वी मालेगावमध्ये २५० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते.          

एका महिन्यात देशभरातील २०० बँक खात्यातून २५०० व्यवहार झाले. मालेगाव येथील सिराज अहमद आणि मोईन खान यांनी गरीब लोकांच्या नावाने बँक खाती उघडली. त्यात चार दिवसांत १२५ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील ३७ खात्यातील जमा रक्कम रोखीत बदलण्यात आली आणि ही रक्कम लागलीच काढण्यात आली.                            

*7 नोव्हेंबरला एफआयआर*
या संदर्भात भाजपचे किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, सीबीडीटी, आरबीआय सर्वत्र लेखी तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यात 7 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा पैसा परदेशातून आल्याचा संशय असल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला होता.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या