*महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला;*
*महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?*
नवी दिल्ली:---महाराष्ट्रात महायुती आणि झारखंडमध्ये सोरेन सरकारला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. महाराष्ट्रात तर महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.
तर झारखंडमध्ये देखील इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकीच्या निकालात एक साम्य आहे. दोन्ही राज्यातील विजयात एक समाना धागा आहे.
महिलांनी दोन्ही राज्यात भरभरुन मतदान केलं. हीच गोष्ट राज्यात महायुती आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरली.*
दोन्ही राज्यांतील विजयासाठी महिलांसाठीच्या योजना प्रमुख कारण ठरल्या. दोन्ही राज्यात महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झालेले पाहायला मिळालं.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर्षी ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आलेल्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दरमाह देण्यात आले.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर मदतीची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. याशिवाय महिलांसाठी एसटीमध्ये निम्मे भाडे यासह अनेक योजना कामी आल्या.*
झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारने यावर्षी ऑगस्टमध्ये 'मैय्या सन्मान योजना' सुरू केली.
ज्यामध्ये महिला मतदारांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) कडे कल वाढला. या योजनेअंतर्गत 21 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.
या योजनेचा फायदा राज्यभरातील सुमारे 50 लाख महिलांना होत असल्याचे सांगण्यात येत आहे.*
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 65.21 टक्के महिलांनी मतदान केले, तर पुरुषांनी 66.84 टक्के मतदान केले.
2019 मध्ये 62.77 टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर महिलांनी 59.2 टक्के मतदान केले. झारखंडमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती.
81 पैकी 68 जागांवर महिलांनी जास्त मतदान केले. नोंदणीकृत 2.61 कोटी मतदारांपैकी 1.76 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. त्यात 1.29 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की 91.16 लाख महिला मतदारांनी मतदान केले, जे पुरुषांच्या मतदानापेक्षा 5.52 लाख अधिक आहे.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा