*येत्या निवडणुकीत तुतारी एवढ्या जोराने फुंकायची आहे की घड्याळाची टिक टिक कायमची बंद झाली पाहिजे*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*येत्या निवडणुकीत तुतारी एवढ्या जोराने फुंकायची आहे की घड्याळाची टिक टिक कायमची बंद झाली पाहिजे*
*त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा: माजी खासदार विनायक राऊत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन*
* देवरुख येथे महाविकास आघाडी संगमेश्वर तालुका कार्यकर्ता मेळाव्याला उत्फुर्त प्रतिसाद*
▪️चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आधी करून दाखवलं आणि मग सांगितलं. नुसत्या भूलथापा मारल्या नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वांनी तुतारी एवढ्या जोराने फुंकायची आहे की, त्यामुळे घड्याळाची टिक टिक बंद झाली पाहिजे. तसेच अन्य मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करूया असे आवाहन शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी देवरुख येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
▪️देवरुख मराठा भवन येथे बुधवारी महाविकास आघाडीचे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे उमेदवार प्रशांत यादव यांचे प्रचारार्थ महाविकास आघाडी संगमेश्वर तालुका कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
▪️यावेळी श्री.राऊत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात महागाई गगनाला भिडत चालली आहे. अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. असे अनेक प्रश्न जैसे थेच आहेत. मग आताच्या सरकारने विकास केला तो नेमका कोणाता आणि कोणाचा केला. या सरकारने महाराष्ट्र लुटण्याचे आणि जातीधर्मामध्ये राजकारण करून महाराष्ट्र उध्वस्त करण्याचे काम केले आहे. जे उद्धवजी व शरद पवारांमुळे मोठे झाले. ते आज त्यांनाच संपविण्याची भाषा करत आहेत.त्यांना संपविणारी औलाद अजुन जन्माला आली नसल्याचे ते म्हणाला. तसेच या सरकारला आता घरात बसविण्याची वेळ आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे, कोकणाला पूरक असे उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देणे आणि बहिणींच्या रक्षणासाठी सध्याच्या सरकारला काहीच करता आले नाही, त्यासाठी आमचे सरकार विशेष पाऊल उचलण्यासाठी तयार असल्याचे श्री. राऊत शेवटी म्हणाले. यावेळी मेळाव्याला माजी खासदार विनायक राऊत यांचेसह माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार डॉ. सुभाष बने, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक सौ. नेहा माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, शिवसेना तालुका प्रमुख बंड्या बोरुकर, काँग्रेसचे दत्ता परकर आदिसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️मोदी सरकारने १५ लाखा पासून फसविण्यास सुरुवात केली आणि आता तेच सरकार पंधराशेवर आले आहेत. अडीच वर्षात याला फोड, त्याला फोड करून महायुती सरकार आणले. त्यामुळे जनतेला महाराष्ट्रात राडा करणारे सरकार हवंय की प्राजक्तासारख्या फुलांचा सडा फुलविणारे सरकार हवंय. विकासाचे श्रेय घेण्याच्या नादात ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि तो काही महिन्यातच कोसळला. त्यामुळे ज्या सरकारने छत्रपती शिवाजी राजांना सोडले नाही, ते सर्वसामान्यांना काय सोडणार. येत्या निवडणुकीत सध्याचे सरकार आणून महाराष्ट्र मातीत गाढायचा आहे की महाविकास आघाडीचे सरकार आणून महाराष्ट्र सन्मानाने उभा करायचा आहेत हे जनतेनेच ठरवायचे आहे. असे मत पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केले.
▪️माजी राज्यमंत्री रवींद्र माने कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, सुरुवातीच्या वेळी माझ्या मनात भीती होती ती प्रशांत यादव राजकारणात तसे नवीन आहेत.. त्यामुळे काय होणार आणि कसं होणार.. पण आजच्या मेळाव्यातील गर्दी पाहून महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल हे निश्चित वाटते. तर सध्याच्या सरकारच्या विकास कामाबाबत बोलताना माने म्हणाले की, या सरकारला विकासाचे काही पडलेले नाही.
▪️कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. पक्षाच्या हितासाठी, महाविकास आघाडीच्या विजयासाठी आणि उद्धव साहेब व शरद पवार साहेब यांचेवर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी सर्वांनी एकमताने काम करूया असे आवाहन माजी आमदार डॉ. सुभाष बने यांनी कार्यकर्त्यांना केले.
▪️शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले की, प्रशांत यादव यांचे रूपात आपल्याला रोजगार निर्माण करणारी व्यक्ती मिळाली आहे. त्यांना निवडून देऊया. तर शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माने-बने यांचा आदेश मानून आमचे शिवसैनिक प्रशांत यादव यांचे काम करत आहेत. प्रशांत यादव यांचा विजय म्हणजे महाविकास आघाडीचाच विजय आहे. त्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागूया.
▪️शिवसेनेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक सौ. नेहा माने या म्हणाल्या की महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, बेकारी, महागाई कमी झाली पाहिजे. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आणि त्यासाठी महाविकास आघाडी हा पर्याय आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने म्हणाले की, शिवसेना (ठाकरे) पक्ष हा आमच्यासाठी कायम मोठा भाऊ राहिला आहे. आज मेळाव्याला शिवसैनिकांची गर्दी पाहून खूप आनंद होतोय.
▪️महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि विश्वास मी प्रामाणिकपणे पार पडेन. आज वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे माझे जे सर्वत्र नाव झाले आहे. तो प्रकल्प उभा राहण्यामागे बने साहेब, महाडिक साहेब व अनेक शेतकरी बांधवांचे हात आहेत. हा प्रवास माझ्यासाठी थक्क करणारा आहे. आजची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची व स्वाभिमानाची आहे आणि आपल्याला सर्वांच्या मदतीने ती जिंकायची आहे. माझ्या हातून यापुढे विकासाला बळ देण्याचे काम होईल. असे मत महाविकास आघाडीचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे उमेदवार प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
▪️या मेळाव्याचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत व संतोष लाड यांनी केली
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment