रत्नागिरी मतदारसंघाचा निकाल लागणार २६ फेऱ्यांमध्ये ; दुपारी २ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
रत्नागिरी मतदारसंघाचा निकाल लागणार २६ फेऱ्यांमध्ये ; दुपारी २ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
रत्नागिरी :--- रत्नागिरी विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर आता मतदारांना २३ तारखेच्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरी विधानसभेच्या मतमोजणीसाठी एकूण २० टेबल लागणार असून त्यातील १४ टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी २६ फेऱ्यामंध्ये होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाची मोजणी होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत या मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून मतमोजणीची तयारी जोरात सुरु आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठीही वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवार व कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पाटबंधारे कार्यालयानजीक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ही मतमोजणी शनिवारी होणार आहे. एकूण २० टेबल लागणार असून, त्यातल १४ टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी होणार आहे. ५ टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार असून एका टेबलवर ईटीपीबीएस मतांची मोजणी होणार आहे.
पोस्टल मतदानाची मोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सकाळी ८.३० सुरु होणार आहे. २६ फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार असल्याने दुपारी २ वाजेपर्यंत रत्नागिरी विधानसभेचा निकाल स्पष्ट होणार आहे.
निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी व पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो , हे लक्षात घेऊन पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पोलिसांनी कुवारबाव आरटीओ नाका ते रेल्वे ब्रीजपर्यंतची वाहतूक सकाळी ६ ते सायं. ४ वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी वाहतूक व्यवस्था पर्यायी मार्गावरून कुवारबाव आरटीओ नाका, कंचन हॉटेल, श्रध्दा हॉटेल, रॉयल एनफिल्ड शोरुम मार्गे वळवण्यात आली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा