*एसटी कर्मचाऱ्यांना आज मिळणार दिवाळी भेट रक्कम*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*एसटी कर्मचाऱ्यांना आज मिळणार दिवाळी भेट रक्कम*
�एसटी कर्मचाऱ्यांना आज (शुक्रवार) दिवाळी भेट रक्कम मिळणार आहे. मात्र, ही रक्कम देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ दिवाळी भेट रक्कम स्वतःच्या उत्पन्नातून देणार आहे. निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा नन्नाचा पाढा सुरूच आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी या वर्षाची दिवाळी भेट रक्कम आचारसंहितेचा अडथळा आल्याने रखडली होती. सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६,००० रुपये दिवाळी भेट इतकी रक्कम दिवाळी भेट देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी एसटी प्रशासनाने ५२ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.
या प्रस्तावासंदर्भात महामंडळाने सरकारकडे वारंवार विचारणा केली. मात्र, सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला नाही. सरकारी अधिकाऱ्यांकडून याबाबत आचारसंहितेचे कारण देण्यात येत होते. आता आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांना तातडीने वाटप करण्यात यावी, असे सरकारकडून एसटी प्रशासनाला कळविण्यात आले आहे. तसेच सरकार ही रक्कम एसटीला देणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.
यामुळे सरकारने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. सध्या एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असून कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. पीएफ, ग्रॅच्युईटीच्या रकमा वेतनातून कपात केल्या असे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र या रकमा ट्रस्टकडे भरल्या जात नाहीत, असा आरोपही बरगे यांनी केला.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा