*रत्नागिरी देवरुखच्या पायलचे बिहारमध्ये अभिमानास्पद सामाजिक पाऊल-*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*रत्नागिरी देवरुखच्या पायलचे बिहारमध्ये अभिमानास्पद सामाजिक पाऊल-*
▪️कोकणातील देवरुखची पायल घोसाळकर, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बिहारमधील लाखो कुटुंबांचे जीवन उंचावण्यासाठी जीविका प्रकल्पाद्वारे मोलाचे कार्य करीत आहे. तिच्या 'जीविका बेस्ड ऑन माय बिहार डायरीज' या लेखात तिने आपल्या जीवन प्रवासाचे थोडक्यात वर्णन केले आहे, ज्यात तिच्या कार्याची प्रेरणादायी कहाणी समाविष्ट आहे.
▪️देवरुखमध्ये स्थायिक होऊन नैसर्गिक शेतीत काम करणाऱ्या आकर्ष कुमार यांच्या कार्याचे कौतुक केले होते, त्याचप्रमाणे आज बिहारमध्ये देवरुखच्या पायलने आपले कार्यक्षेत्र विस्तारून, बिहारमधील लाखो लोकांचे जीवनमान उंचावत, कोकणासह महाराष्ट्रातील तरुणींना आदर्श निर्माण केला आहे.
पायल घोसाळकर ही सुप्रसिद्ध भजन सम्राट राजु घोसाळकर यांची कन्या असून, तिने लहानपणापासूनच भजनाच्या माध्यमातून समाजात विशेष स्थान निर्माण केले आहे.
▪️जाखडी, नमन, ऑर्केस्ट्रा, बेंजो, जलसा, कव्वाली या विविध संगीतप्रकारांवर राजु घोसाळकर यांचे प्रभुत्व आहे. पायल ने त्यांच्या पावला वर पाऊल टाकत या सर्वात प्रभुत्व गाजवले आणि युवा भजन सम्राट म्हणून कोकणात नावलौकिक मिळवला भजनामधून स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, लेकीची सुरक्षा, पाणीसंवर्धन, कोकणातील जमिनींचे संवर्धन यांसारख्या ज्वलंत मुद्यांवर तिने समाजप्रबोधन केले आहे.
▪️तिच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली कोसुंब हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना. फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे इकॉनॉमिक्स विषयात पदवी आणि अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगलोरमधून पुढील शिक्षण घेतल्यानंतर तिच्या सामाजिक जाणिवेचे बाळकडू विकसित झाले. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या प्रकल्पाद्वारे ईशान्य भारतात शेतकरी महिलांसाठी कार्य करत असताना तिच्या कामाचे कौतुक झाले आणि त्याच माध्यमातून बिहार सरकारने तिला त्यांच्या जीविका प्रकल्पासाठी नियुक्त केले.
▪️बिहारमध्ये सीता मातेच्या माहेर असलेल्या मधुबनी जिल्ह्यात तिने कार्याची सुरुवात केली. बिहारची प्रतिमा अनेकदा विपरित दिसत असली, तरी गरिबी, बेरोजगारी आणि जातीय वादाच्या समस्यांवर तीने प्रभावीपणे मात केली. पहिल्याच वर्षी तिने सुमारे ३० हजार शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य केले, आणि हा आकडा दरवर्षी वाढत आहे. आज ती बिहारच्या पाटणातील मंत्रालयातून काम करत असून, २ लाख कुटुंबांना सक्षम बनवण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.
▪️याच दरम्यान विविध देशांतील पाहुण्यांना बिहारची परिस्थिती समजावून देण्याचे काम तिच्याकडे आले. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारच्या पथकाला तिच्या कार्याचे विशेष कौतुक वाटले. त्यांनी तिला महाराष्ट्रात आणण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु महाराष्ट्रात जीविका प्रकल्प नसल्याने ती बिहार सोडू शकत नाही.
▪️छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांच्या विचारांनी प्रेरित होऊन, देवरुख सारख्या छोट्या गावातून निघालेली पायल बिहार सारख्या प्रदेशात आत्मविश्वासाने कार्यरत आहे. तिचे हे ध्येय आणि कर्तृत्व कोकणातील अनेक कन्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
▪️पायलच्या धाडसी कार्यप्रवृत्तीमुळे तिचे नाव कोकणात आदराने घेतले जाते.
बिहारमध्ये लाखो लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या कोकणकन्या देवरुखच्या पायल घोसाळकरला पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment