*आलिशान फ्लॅटमधून परदेशी वन्यजीवांची सुटका*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*आलिशान फ्लॅटमधून परदेशी वन्यजीवांची सुटका*      


 कल्याण-शिळ महामार्गावरील उच्चभ्रुंची लोकवस्ती असलेल्या पलवा सिटीतील एका आलिशान फ्लॅटवर मिळालेल्या खबरीच्या आधारे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत वन विभागाने परदेशी वन्यजीवांची आलिशान फ्लॅटमधून सुटका केली. करोडो रूपये किंमतीच्या या वन्य जीवांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या सापांसह चिपांझी यांचा देखील समावेश होता.                        

कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या एक्स्पिरिया मॉल जवळील पलवा सिटीतील सवरना बिल्डिंगच्या बी विंग मधील आठव्या मजल्यावरच्या 806 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये परदेशी वन्य प्राणी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे वनविभागाने सापळा रचला                          

या पथकांनी या फ्लॅटमधील हॉल, बेडरूमसह वॉशरूमची तपासणी केली असता एकावर एक रचून ठेवलेले प्लास्टिकचे बॉक्स आणि लोखंडी जाळ्यांच्या पिंजऱ्यात कोंडलेले प्राणी आढळून आले. त्यात कासव, साप, अजगर, एग्वणा (सरडा), चिपांझी जातीच्या माकडाचा या जीवांमध्ये समावेश होता. विशेष म्हणजे सदर फ्लॅटमध्ये कुणीही व्यक्ती आढळून आली नाही. बऱ्याच दिवसांपासून सदर बंद फ्लॅटमधुन उग्र दर्प येत असल्यामुळे शेजाऱ्यांचाही संशय बळावला होता. त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला. हे प्राणी भुकेले असावेत. बऱ्याच दिवसांपासून गुदमरलेल्या अवस्थेतील या जीवांना खायला काही मिळाले नसाववे, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कारवाई करून प्रतिबंधित वन्यजीव बाळगलेले वन्यजीव जप्त करण्यात आले. कार्यवाही दरम्यान घटनास्थळी कुणीही इसम आढळून आला नाही. त्यामुळे या प्राणांना बंद फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलेल्या फरार इसमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह वन विभागाची पथके रवाना करण्यात आली आहेत. हे सर्व प्राणी कोणत्या देशातून कोणत्या मार्गे, कुणी आणि कसे आणले ? या प्राण्यांची तस्करी करण्यात आली आहे का ? यांची उकल आता पोलीस करीत आहेत.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments