*दुचाकीवर सहप्रवाशांना हेल्मेट बंधनकारक*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*दुचाकीवर सहप्रवाशांना हेल्मेट बंधनकारक*
वाढत्या अपघाताच्या पृष्ठभूमीवर दुचाकीस्वारांचा हाेणारा मृत्यू आणि गंभीर दुखापतींना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने पावले उचलली आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता सहप्रवाशांनाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. संपूर्ण राज्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करणारे परिपत्रक अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) अरविंद साळवे यांनी काढले आहे.
शहरासह ग्रामीण भागांत माेठ्या प्रमाणावर दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. साेबतच अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला हाेता. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर कारवाईचा आदेश पाेलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पाेलिस आयुक्त व पाेलिस अधीक्षकांना दिला आहे. सोमवार २५ नाेव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना हेल्मेट न घातल्यास पिलियन रायडरवरही कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेटसक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली होती. यात हजारो मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात आली. परिणामी सर्वच महानगरांमध्ये हेल्मेट घालण्याचे प्रमाण वाढले. त्यापाठोपाठ आता मोटारसायकलस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशांना (पिलीयन रायडर) हेल्मेट सक्तीने घालण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत.
मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवित असताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर वाहतूक प्रकरणे दाखल होतात. त्याकरीता वापरण्यात येणाऱ्या ई-चालान मशिनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलियन रायडर यांच्यावरील कारवाई वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये होत असल्याने कारवाईची वेगळी माहिती मिळत नव्हती. आता ई-चालान मशिनमध्ये बदल केले जात आहे. यापुढे विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलियन रायडर अशा दोन हेडखाली कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा