एकनाथ शिंदेंचा ट्विट करून कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

एकनाथ शिंदेंचा  ट्विट करून कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज 

मुंबई :-  भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र, स्पष्ट जनादेश मिळालेला असताना मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलचा सस्पेन्स संपलेला नाही. 

  यापूर्वी इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने प्रत्येक वेळी नवा चेहरा देऊन धक्का दिला. त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार, याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, आमदार मुख्यमंत्रि‍पदासाठी आग्रह करू लागले आहेत. अशात एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एक मेसेज दिला आहे. 
      विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनंतर सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. ५७ जागा जिंकत दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी होऊ लागली आहे. 
      शिवसेनेचे काही आमदार, नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेले होते. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप गेले असल्याचे समजते. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज दिला आहे. 
      एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत."
       "माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. 

.मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही  एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  
       महायुतीत मुख्यमंत्रि‍पदाचा आणि मंत्रि‍पदाच्या वाटपाचा तिढा निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले आहे. सोमवारी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण तसा कोणताही निर्णय झाला नाही. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची बैठक होऊ शकली नाही. 
      दरम्यान, आज (२६ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

  दोन्ही नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नव्या मंत्रिमंडळाबद्दल चर्चा होणार असल्याची चर्चा आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या