*राज्यात रक्ताचा तुटवडा; चार दिवस पुरेल इतकाच साठा*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*राज्यात रक्ताचा तुटवडा; चार दिवस पुरेल इतकाच साठा*

एकापाठोपाठ आलेल्या सणांच्या सुट्ट्या आणि विधानसभा निवडणूक यामुळे राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले आहे. परिणामी, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, मुंबईसह राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त हस्तांतरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
        
राज्यातील रक्तपेढ्यांनी परराज्यातील रक्तपेढ्यांना रक्त विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रक्तपेढ्यांकडून रक्त मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे केल्या आहेत.
        
राज्यात मोठी आपत्ती घडल्यास रक्त तुटवडा प्रकर्षाने जाणवू शकतो. असे असतानाही राज्यातील काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्त व रक्त घटक यांची मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. ही बाब लक्षात घेत रक्तपेढ्यांनी राज्यातील रक्ताच्या गरजेला प्राधान्य द्यावे. अशी भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे.
      
या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गृहनिर्माण संस्था संकुलामध्येही शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या