सिरोंचा तालुक्यात अनेक गावात कॉर्नर सभा
*सिरोंचा तालुक्यातील विविध ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थित संपन्न..!*
सिरोंचा : आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे ( अपक्ष ) उमदेवार हनमंतु मडावी यांच्या प्रचारासाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती माजी सभापती व विद्यमान संचालक अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिरोंचा तालुक्यातील लांबडपाल्ली,पेंटीपाका,तुमनूर,आयपेठा,नड्डीकुडा,कोत्तापाल्ली,चिंतारेवला,अंकिसा,असारेल्ली,मोटलाटेकडा,गुम्मलकोंडा,सोमनूर,मुक्कीडगुट्टा,कोर्ला,कोपेल्ला,झिंगानूर,रमेशगुडम,रोमपाल्ली,किष्ठायपाल्ली आदी गावातील विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली आहे.
दरम्यान कॉर्नर सभेला उपस्थित मतदारांना महत्वाच्या विविध समस्या विचारात घेऊन येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे ( अपक्ष ) उमेदवार हणमंतू गंगाराम मडावी यांच्या बारा क्रमांकवर आसलेल्या *रोडरोलर* या चिन्ह समोर बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी गावोगावी घरोघरी आपण सर्व प्रचार करावे.आणि मतदान करण्याचे आव्हान माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
अज्जूभाऊ,मडावी साहेब आगे बडो हम तुमारे साथ है जयगोषाने अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांची गावातील नागरिकांकडून ढोल ताशांचा निनादात फटाक्याच्या जल्लोषात गावात स्वागत केली आहे.विविध ठिकठिकाणी काॅर्नरसभा अन सभानां नागरिकांची प्रचंड प्रतिसाद मिळाले आहे.
काॅर्नर सभेला आविसंचे जेष्ठनेते मंदा शंकर,जेष्ठनेते व सिरोंचा बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,सरपंच सूरज गावडे,आविसंचे जेष्ठनेते रवी सल्लम,सिरोंचा नगरपंचायतचे बांधकाम सभापती मारुती गाणपूरवार,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगली,किरण वेमूला,अजयभाऊ सोशल मीडिया संपत गोगूला,गणेश रच्चावार,लक्ष्मण बोल्ले,राजेश पडला,संपत अंबाला आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment