*कंत्राटी कामगारांना कार्यालयात मोबाइल वापरण्यास बंदी, पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*कंत्राटी कामगारांना कार्यालयात मोबाइल वापरण्यास बंदी, पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय!*
पुणे : कार्यालयीन वेळेत भ्रमणध्वनीच्या (मोबाईल) अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (पीएमआरडीए) कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार कंत्राटी कामगार नियुक्त केलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रणेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.*
पीएमआरडीएला ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. या मंजूर आकृतीबंधामधील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत.
प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत तसेच सरळसेवा पदांची बिंदू नियमावली मंजूर होऊन ही पदे एमपीएससी किंवा जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास अद्यापही काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ही पदभरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्त्रोत यंत्रणा नियुक्त करून त्यांच्या मार्फत कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले होते.
बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त केलेल्या या कंत्राटी कामगारांकडून कार्यालयीन वेळेत मोबाईलचा अतिवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचा परिणाम पीएमआरडीएच्या कामकाजावरही होत होता. मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने गोपनियतेचा भंग होण्याचा धोकाही निर्माण झाला होता.
त्यामुळे कंत्राटी कामगारांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी पूर्णवेळ कामकाजात व्यस्त राहतील आणि कामकाजात सुरळीतपणा येईल, असा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, कंत्राटी कामगार वगळता पीएमआरडीएचे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईलचा वापर करता येणार आहे, असेही पीएमआरडीए प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा