*रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार*

शुक्ला यांच्या कमबॅकमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी         


रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवल्यानंतर त्वरीत हा निर्णय घेण्यात आला. आज (मंगळवार) सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदमुक्त करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवले आणि त्यांच्याऐवजी संजय कुमार वर्मा यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पंरतु, ही नियुक्ती तात्पुरती होती.

विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक यांची निवडणूकपूर्वी बदली करण्यात आली होती, तसेच जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. शुक्ला यांच्या भेटीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाबाबत आयपीएस लॉबीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांच्या कमबॅकमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यामध्ये नाराजी पसरली आहे.                                        

रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कालावधी वाढवून दिल्यामुळे दोन वर्षे राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून शुक्ला असतील. शुक्ला यांच्या येण्यामुळे जेष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यात नाराजी असून रश्मी शुक्ला यांना यापूर्वीच दोन वर्षांचा कालावधी वाढविण्यात आला आहे, त्यात पुन्हा त्या पोलीस महासंचालक पदावर रुजू झाल्यावर जेष्ठ आयपीएस अधिकारी यांची या पदावर वर्णी लागणार नसल्यामुळे जेष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यात नाराजी पसरली आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या