"नाद करायचा नाय..", पक्ष सोडून गेलेल्यांना शरद पवारांचा थेट इशारा; भर सभेत म्हणाले...!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
"नाद करायचा नाय..", पक्ष सोडून गेलेल्यांना शरद पवारांचा थेट इशारा; भर सभेत म्हणाले...!*
निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार. शेवटच्या रविवारी विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत. विरोधकांवर टीकास्र डागलं जातंय. गेल्या अडीच वर्षांत बदललेल्या समीकरणांचा आढावा घेतला जातोय. त्यावरून मतदारांना आवाहन केलं जातंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशाराच दिला आहे. सर्वांचा नाद कराचा, पण…. असं म्हणत शरद पवारांनी आज टेंभुर्णी येथील सभा गाजवली.*
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यांचे ४० आमदार त्यांना सोडून गेले.
परिणामी पक्षात दोन गट पडले. पण शरद पवारांसाठी हा अनुभव नवा नव्हता. १९८० सालीही त्यांना अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी त्यांना सोडून गेलेल्या आमदारांचा कसा पराभव केला याचं उदाहरण देत आताच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.
*निवडून आणलेले आमदार सोडून गेले*
शरद पवार म्हणाले, “१९८० सालात निवडणूक झाली. त्या निवडणुकीत माझ्या आणि सहयोगी पक्षाच्या वतीने एकंदरीत ५८ लोक निवडून आले. मी ५८ लोकांचा नेता झालो. विरोधी पक्षनेता झालो.
एकदा मी चार दिवसांकरता परदेशी गेलो आणि परत आलो तर तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी काहीतरी चमत्कार केला होता. निवडून आलेल्या ५८ आमदारांपैकी ५२ आमदारांना ते घेऊन गेले. त्यामुळे सहा लोकांचा नेता राहिलो. विरोधी पक्षनेतेपद गेले.”
*…अन् सोडून गेलेले ५२ आमदार पडले*
“आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. तीन वर्षे अहोरात्र प्रयत्न केले. निवडणुकीला जे मला सोडून गेले, त्यांच्याविरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या जनतेचा की ते ५२ लोक निवडणुकीत पडले”, असा अनुभव शरद पवारांनी शेअर केला.
ते पुढे म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं पाडायचं नाही. जोरात पाडायचं. पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा…”, असं म्हणताच समोर बसलेल्या समर्थकांमधून आवाज आला की नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही.”
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा