*महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप नेतृत्वाची पसंती*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप नेतृत्वाची पसंती*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राजकारभार पाहत आहेत. बरीच चर्चा व वाटाघाटी नंतर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला असला तरी त्याच्या छोट्या भावांनी म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तावाटपाच्या चर्चेत चांगलाच जोर लावला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. महायुतीने ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली. त्यामुळे शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाईल असा दावा केला जात होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती आहे.
*तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा मान?*
उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. त्यानंतर 2019 मध्ये राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने पहाटेच्या वेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण ते औटघटकेचे सरकार ठरले होते. त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
*मुख्यमंत्र्यांसोबत 20 मंत्र्यांची शपथ*
उपलब्ध माहितीनुसार, नव्या मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. तर शिवसेनेचे 6 व अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. महायुतीत मंत्रिपदासाठी चांगलीच स्पर्धा वाढली आहे. राज्याच्या मावळत्या विधानसभेचा कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात आला. मात्र, अजूनही नव्या सरकारच्या स्थापनेविषयी स्पष्टता आलेली नाही. नवे सरकार तातडीने अस्तित्वात न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता बळावली आहे.
महायुतीने अभूतपूर्व यश मिळवून राज्याची सत्ता राखली. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाल्याने नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया रखडल्याचे दिसत आहे. त्यामुळे अल्पकाळासाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे आहेत. नवे सरकार स्थापण्याच्या हालचाली झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट हटवली जाईल. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा