*मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची गुहागरमध्ये तोफ धडाडणार!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची गुहागरमध्ये तोफ धडाडणार!*

 महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारार्थ सभा


 महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारार्थ ना. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ११.३० वाजता पाटपन्हाळे येथील हायस्कूलच्या मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार असल्याची माहिती गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश बेंडल आणि महायुतीच्या नेत्यांनी चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी राजेश बेंडल यांनी माहिती देताना सांगितले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातर्फे महायुतीकडून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.  गुहागर विधानसभेत लढताना आपण स्वत:चे एक व्हिजन ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची गरज आहे, यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले. मच्छीमार बांधवांचे प्रश्न आणि लोटे एमआयडीसीमधील दूषित पाणी सोडल्याने होणारे प्रदूषण होऊ नये, यासाठी ठोस पाऊले उचलणार आहोत, असे स्पष्ट केले. आपण जरी कुणबी समाजातील असलो तरीही सर्व समाजाला सोबत घेवून तळागाळातील घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, साठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनापासून गुहागर विधानसभेत काम करीत आहेत. त्यामुळे आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार याची खात्री आहे, अशी त्यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेनेचे नेते आ. रवींद्र फाटक यांनीदेखील मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गुहागर दौऱ्याची माहिती दिली. यावेळी माजी आ. डॉ विनय नातू, माजी आ. सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष शरद शिगवण, संदेश आयरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या