*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे-भाजपची छुपी युती? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बहुतेक उमेदवारांविरोधात उमेदवार दिल्यामुळं चर्चेला उधाण*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे-भाजपची छुपी युती? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बहुतेक उमेदवारांविरोधात उमेदवार दिल्यामुळं चर्चेला उधाण*
*मुंबई-*-- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख़्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेविरोधात भाजप व राज ठाकरे यांच्यात छुपा समझोता झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं एकनाथ शिंदे यांच्या बहुतेक उमेदवारांविरोधात उमेदवार दिल्यामुळं ही चर्चा रंगली आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना महायुतीमध्ये आहेत. तर, मनसे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर संपूर्ण राज्यातील लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. मनसेनं मुंबईतील ३६ पैकी २५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महायुतीकडून मुंबईत भाजप १०, तर शिवसेना १२ जागांवर निवडणूक लढवत आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. मनसेनं राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, विनोद शेलार, मिहीर कोटेचा, तमिळ सेल्वन यांना वॉकओव्हर दिला आहे. हे सर्व जण फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गट ज्या जागांवर निवडणूक लढवत आहे, त्या सर्व जागांवर राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले आहेत.
यात वरळी, सदा सरवणकर यांच्या माहीम मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, दिलीप लांडे, संजय निरुपम, मनीषा वायकर, अशोक पाटील, सुवर्णा राज, प्रकाश सुर्वे यांचा समावेश आहे. या सर्वांच्या विरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी शायना एनसी यांच्याविरोधात उमेदवार उभा केलेला नाही. त्या मुंबादेवी मतदारसंघातून लढत आहेत. शायना एनसी या शिंदेंच्या पक्षाकडून लढत असल्या तरी मूळच्या भाजपच्या आहेत.
मनसेनं मुरजी पटेल यांच्याविरोधात देखील उमेदवार दिलेला नाही. ते देखील शिंदेंच्या सेनेकडून निवडणूक लढवत आहेत, मात्र मूळचे भाजपचे आहेत. हे कारण यामागे असावं असं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र कमी जागा लढवूनही आपण ७ जागा जिंकल्या असं शिंदे व त्यांच्या पक्षाचे लोक सांगत होते. त्यामुळं विधानसभेतील जागावाटपात त्यांनी बरंच ताणून धरलं होतं. शिंदे यांच्या पक्षाला मुंबई व ठाण्यात चांगला पाठिंबा आहे. या जागांवर त्यांचा पराभव झाला तर महायुतीमध्ये त्यांची उंची कमी होणार आहे. ते करण्यासाठीच भाजप मनसेची मदत घेतोय का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. भाजपशी पूर्ण चर्चा करूनच मनसे निवडणुकीत उतरली असल्याचं बोललं जात आहे.
राज ठाकरे हे आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लक्ष्य करत असल्यानं या चर्चेला बळकटी मिळाली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment