भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची गुहागर भेट..!अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न..!

आबलोली (संदेश कदम):
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष सन्मा.केदारजी साठे यांनी नुकतीच गुहागर भेट दिली. या भेटीमध्ये भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोष जैतापकर यांनी केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जाबाबत ही भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.
उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई स्थित असणारे संतोष जैतापकर हे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मुंबईला गेले असल्याने त्यांची आणि जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही. मात्र भ्रमणध्वरीवरून झालेल्या संपर्कातून महायुतीच्या व्यापक आणि उज्वल भवितव्यासाठी संतोष जैतापकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या पाठीमागे उभे राहण्याची सुचना वजा विनंती जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केली आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याचे पूर्ण संकेत असल्याकारणाने आपल्याकडून महायुतीला महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. गुहागर विधानसभेतील विद्यमान आमदाराला घरी बसवण्याचे सर्वसामान्य
 मतदारांचे स्वप्न साकार व्हावे. महायुतीच्या माध्यमातून गुहागर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा. याकरता महायुतीच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहण्याचे आवाहन केदार साठे यांनी जैतापकर यांना केले आहे आणि याबाबत आपणही सकारात्मक विचार करू असे सूचक मत जैतापकर यांनी साठे यांच्याकडे व्यक्त केले आहे.

Comments