*दिल्लीत प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*दिल्लीत प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय*


 दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० टक्के कर्मचारी हे आता त्यामुळे घरून काम करतील असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही बोलावली आहे.
         
पर्यावरणमंत्री गोपाल राय दिल्ली सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतींबाबत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीत वर्क फ्रॉम होम करण्याच्या पद्धती ठरवल्या जातील. जेणेकरून सरकारी कामात अडथळा येणार नाही. गेल्या काही दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमी झाला असला तरी, AQI अजूनही अत्यंत गंभीर श्रेणीत आहे.
     
आज बुधवारी सकाळी ६.४५ वाजता देखील दिल्लीत AQI अत्यंत खराब म्हणून नोंदवण्यात आला. द्वारका आणि उत्तम नगरमध्ये सर्वाधिक 388 AQI नोंदवला गेला. याशिवाय जनकपुरीमध्ये ३८४, सुखदेव विहारमध्ये ३८१, अलीपूरमध्ये ३७९, शालीमार बागेत ३७७, रोहिणीमध्ये ३८२, मॉडेल टाऊनमध्ये ३७७ ची नोंद झाली आहे. आजही दिल्लीतील बहुतांश भागात AQI ३०० पेक्षा जास्त आहे.

दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी केंद्र सरकारला प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेजारील राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावण्याचं आवाहन केलं होतं. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दिल्ली सरकारने वारंवार केलेल्या विनंतीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही ते म्हणाले होते.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या