रोजगाराच्या अपेक्षेने युवा वर्ग डॉ.धर्मराव बाबा सोबत जुडत असल्याचे दिसून येत आहे
ग्रामीण भागात कॅार्नर सभांचा धडाका, रोजगाराच्या अपेक्षेने युवा वर्ग डॉ.धर्मरावबाबासोबत जुळत असल्याचे दिसून येत आहे
कौशल्य विकासासह रोजगारावर भर
गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमधील उमेदवारांनी सध्या ग्रामीण भागातील प्रचारावर भर दिला आहे. अहेरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी गावभेटी आणि अनेक गावांमध्ये कॅार्नर सभांचा धडाका लावला आहे. यादरम्यान युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्याशी जुळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कौशल्य विकासासोबत रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे सांगत धर्मरावबाबांनी युवा वर्गाच्या मनाचा ठाव घेतला आहे.
मोसम, नंदीगाव, गोलाकर्जी, राजाराम, गुड्डीगुडम आदी ठिकाणी धर्मरावबाबांच्या कॅार्नर सभांना गावकऱ्यांनी गर्दी केली होती. उमानूर येथील कॉर्नर सभेनंतर अनेक युवकांनी उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून धर्मरावबाबांच्या मार्गदर्शनात काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यांचे पक्षाचे दुपट्टे टाकून स्वागत करण्यात आले.
युवा वर्गाला बळ देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत तालुकास्तरावर नवीन आधुनिक शाळा आणि इंजिनिअरिंग कॉलेजची उभारणी करण्याचेही सुतोवाच धर्मरावबाबांनी केलें

Comments
Post a Comment