*रस्ता नसल्यानं पाच महिन्यांच्या गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेलं,**पण वेळेत दवाखान्यात पोहोचता आले नसल्याने बाळ पोटातच दगावले*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*रस्ता नसल्यानं पाच महिन्यांच्या गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात नेलं,*
*पण वेळेत दवाखान्यात पोहोचता आले नसल्याने बाळ पोटातच दगावले*
नंदुरबार:---राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. नेत्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अनेक आश्वासनं आणि घोषणा केल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षात पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने एका महिलेचा गर्भपात झाला आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे.
येथे एका महिलेला पाच महिन्यातच प्रसूतिकळा सुरू झाल्या. मात्र, रस्ता नसल्याने बांबूची झोळी करून तिला तिच्या नातेवाइकांनी दवाखान्यात नेले. मात्र, वेळेत दवाखान्यात पोहोचता आले नसल्याने तिचे बाळ पोटातच दगावले. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.*
नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडामधील एका गर्भवती महिलेच्या अचानक पोटात दुखू लागले. तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. मात्र, तिच्या पाड्यावर रस्ताच नसल्याने तिच्या नातेवाइकांनी बांबूची झोळी करून या महिलेला तब्बल साडेआठ किलोमीटर पर्यंत मुख्य रस्त्यावर आणले.
मात्र, या भागात रुग्णवाहिकाही देखील नसल्याने एका खासगी वाहनातून या माहीलेला पिंपळखुटाच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, खराब रस्ता असल्याने एका पाणी साचलेल्या भागात या महिलेची गाडी अडकून पडली.*
हे वाहन यातून बाहेर काढण्यासाठी मोठा वेळ गेला. यामुळे वेळेत महिला दवाखान्यात न पोहोचल्याने या महीलेचा गर्भपात झाला. नंदुरबार जिल्ह्यात आजही अनेक गावे ही मुख्यरस्त्याला जोडली गेली नाही.
अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने त्यांना पायपीट करावी लागते. तर जे रस्ते आहेत ते देखील नादुरुस्त आहेत. या पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करून देत असते. मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे पावसाळा व हिवाळ्यात रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करण्याची वेळ दरवर्षी येते. महिलेचा गर्भपात झाल्याने महिला मोठ्या मानसिक धक्क्यात आहे.
तिला पिंपळखुटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा गर्भपात झाला असला, तरी या महिलेची प्रकृती चांगली असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा