*संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!*

मुंबई : --लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. 

 निवडणूक याचिकेतील कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले. 

  तसेच, पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांची याचिका फेटाळून लावली.*

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. परंतु, थोरात यांनी वैधानिक ४५ दिवसांच्या कालावधीनंतर म्हणजेज ३ सप्टेंबर रोजी मतदारसंघातील अन्य १८ प्रतिस्पर्धी उमेदवारांना याचिकेत प्रतिवादी करण्याची मागणी केली. 

   एखादा उमेदवार स्वतःच्या पराभवासंदर्भात न्यायालयात दाद मागतो, त्यावेळी संबंधित मतदारसंघातील अन्य उमेदवारांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. याप्रकरणी थोरात यांनी इतर उमेदवारांना प्रतिवादी केलेच नाही किंवा तसे करण्यासाठी योग्य अर्ज केला नाही. 

  थोरात हे निवडणूक याचिकेसाठी अनिवार्य असलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करण्यास अपयशी ठरले, त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचे नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईच्या नावाचा उल्लेखच केला नाही. 

  हे निवडणूक नियमावलींचे उल्लंघन असून पाटील यांची खासदारकी यामुळे अवैध ठरत असल्याचा दावा व्यवसायाने टॅक्सीचालक असलेल्या याचिकाकर्त्यांनी निवडणूक याचिकेद्वारे केला होता. पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा २९ हजार ८०० मतांच्या फरकाने पराभव केला होता. 

  खासदार म्हणून पाटील यांची दुसरी वेळ असून २००९ मध्ये त्यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांचा पराभव केला होता.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या