*चिखलगाव येथील बांधकाम कंपनीच्या गोडावूनमधील दोन लाखाचे साहित्य चोरीला*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*चिखलगाव येथील बांधकाम कंपनीच्या गोडावूनमधील दोन लाखाचे साहित्य चोरीला*


तालुक्यातील चिखलगाव येथील एका बांधकाम कंपनीच्या गोडावून मधील सुमारे 2 लाख 17 हजार रूपये किंमतीचे बांधकामाला लागणारे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एम.सी.बेटीगेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर गणेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजापूर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
     
एम.सी.बेटीगेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे राजापूर-सौंदळ रस्त्यावर चिखलगाव येथे दोन शटरचे मोठे गोडावून असून या गोडावूनमध्ये पुल तसेच रस्त्यांच्या कामाकरीता लागणारे साहित्य ठेवलेले होते. जून 2024 मध्ये तेरवण येथील पुलाचे काम संपल्यानंतर पूल बांधणीचे सर्व साहीत्य सदरच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते. दर चार-पाच दिवसांनी कंपनीचे सुपरवायझर गणेश चव्हाण हे गोडावूनमध्ये जावून पाहणी करत असत. दि.३० ऑक्टोबर रोजी त्यांनी गोडावूनमध्ये जावून पाहणी केली असता सर्व साहित्य जागेवर होते. त्यानंतर दि.6 नोव्हेंबर रोजी दुपारी चव्हाण हे पुन्हा गोडावूनमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता गोडावूनच्या गेटचे लॉक व साखळी तुटलेली आढळली. तर शटरचे लॉकही तोडलेले होते. तसेच गोडावूनमधील साहित्य देखील जागेवर नव्हते. 

अज्ञात चोरट्यांनी गोडावूनमधले इलेक्ट्रीक पंप, इलेक्ट्रीक व्हायब्रेटर, रॉकेल पेट्रोल व्हायब्रेटर, रॉकेलवर चालणारे पाण्याचे पंप, लोखंडी घण, कॉपर वायर, सेंट्रींगच्या प्लेटा असे सुमारे 2 लाख 17 हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी गणेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (3), 334 अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या