*जागेच्या वादातून प्रवाशाची अल्पवयीन मुलाकडून हत्या; आरोपी मुलासह भावाला अटक*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*जागेच्या वादातून प्रवाशाची अल्पवयीन मुलाकडून हत्या; आरोपी मुलासह भावाला अटक*   

सीटच्या वादातून अंकुश भालेराव या 37 वर्षांच्या प्रवाशाची एका अल्पवयीन मुलाने चाकूने वार करत हत्या केली होती. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलासह त्याचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्लाह सोहेल बेठा याला अटक केली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर मोहम्मद सनाउल्लाहला कुर्ला येथील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हत्येची माहिती असतानाही आपल्या भावाला मदत करण्याचा तसेच हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे.             

अंकुश हा टिटवाळा येथे राहत असून घाटकोपरच्या एका वाईन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे. 14 नोव्हेंबरला तो टिटवाळा येथून घाटकोपरला जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होता. यावेळी त्याचा सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी वाद झाला. त्यातून त्याने त्याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा या मुलाच्या मनात राग होता. दुसर्‍या दिवशी त्याने घाटकोपर रेल्वे स्थानकात अंकुशवर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.                      

रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद सनाउल्लाहला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्या भावाने हा हल्ला केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर चाकू हल्ला करणार्‍या सोळा वर्षांच्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले, तर मोहम्मद सनाउल्लाहने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला मदत केल्याने या गुन्ह्यांत सहआरोपी दाखविण्यात आले आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या