*जरांगे फॅक्टर फेल!* *महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी,* *भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी*
*जरांगे फॅक्टर फेल!*
*महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी,*
*भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी*
मुंबई:---महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा ताणतणाव पाहायला मिळतो आहे. कारण एक्झिट पोल्स आणि एकूणच सामाजिक परिस्थिती पाहता जो निकाल अपेक्षित होता, त्यापेक्षा खूपच वेगळा निकाल पाहायला मिळतो आहे.
यामध्ये मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे यांचा प्रभाव जाणवेल असं वाटतं होतं. पण हा प्रभाव आजिबातच जाणवलेला नाही. त्यामुळं या निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल ठरल्याचं दिसत आहे.*
*मनोज जरांगेंचा प्रभाव किती ?*
*मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन हे जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून सुरु केलं होतं.
वारंवार त्यांनी याच ठिकाणी उपोषण केलं. सरकारला त्यांनी चांगलंच जेरीस आणलं होतं. मुंबईपर्यंत त्यांनी धडक दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः एकदा आंतरवालीत आणि एकदा मुंबईच्या वेशीवर अर्थात नवी मुंबईत जरांगेंना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या मागण्या जवळपास मान्य केल्या होत्या. त्यामुळं जरांगेंच्या सभेला मिळणारा प्रचंड पाठिंबा आणि त्यांचा राहिलेला प्रभाव यामुळं जरांगे पाटील यांचा लोकसभेप्रमाणं विधानसभेला सुद्ध चांगलाच प्रभाव राहिलं असं वाटतं होतं.मराठवाड्यातील जो भाग शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर आहे. याच भागात मोठ्या प्रमाणावर मराठा पाटील समाजाचं मोठं वर्चस्व आहे.
यामध्ये जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीतही याच जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसून आला होता. त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळं तीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत देखील होईल, असं वाटतं होतं.*
*जरांगे फॅक्टर का ठरला फेल?*
*मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं ही ठाम मागणी लावून धरतं, मोठं आंदोलन उभं केलं.
पण यामुळं ओबीसी समाजाला असुरक्षित वाटू लागल्यानं त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाविरोधात आंदोलन सुरु केलं. यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरु केलं. त्याचबरोबर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील जोरकसपणे जरांगेंच्या मागणीला विरोध दर्शवला. यामुळं खरंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशी फूट पडल्यासारखी स्थिती होती.*
दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ पण ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका शिंदे सरकारनं घेतली. त्यातून त्यांनी जातीय समीकरणं निश्चित करत ओबीसी समाजाची मतं (कुणबींसह) आपल्याकडं राखण्यात यश तर मिळवलंच पण त्याचबरोबर जरांगेंच्या मागणीला विरोध असणारा मराठा समाजाचीही मतं आपल्याकडं राखल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देखील या निवडणुकीत महायुतीसाठी संजीवनी ठरली आहे.*
मराठवाड्यात सुमारे २५ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
यावरुन जरांगेंचा प्रभाव असलेल्या भागात महायुतीला फटका बसेल असं वाटत होतं. पण यामध्ये महायुतीनं २५ जागा किंवा त्याहून अधिक जागा जिंकण्याच्या स्थितीत असल्यानं जरांगे फॅक्टर पूर्णपणे फेल झाल्याचं स्पष्ट होत आहे.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा