उमानूर येथे हनुमंतुमडावी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न सभेला उमानूर परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद
*उमानूर येथे हणमंतू मडावी यांच्या निवडणूक प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न*
*कॉर्नर सभेला उमानूरसह परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी...!*
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार अधिकृत उमेदवार हणमंतू गंगाराम मडावी यांच्या निवडणूक प्रचारार्थ अहेरी तालुक्यातील उमानूर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आलं होता.
या प्रचार सभेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती नागरिकांना बहुमूल्य मार्गदर्शन करीत बदलाचे बाजूने उभे राहण्याचे आव्हान केले.
तसेच विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार हणमंतू मडावी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मतदारांनी मला आमदार म्हणून निवडून दिल्यास संपूर्ण विधानसभा क्षेत्राचे विकास घडवून आणण्यासाठी कठीबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रचारसभेला नागरिकांची लक्षनीय उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा