‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Allu Arjun National Award : टॉलीवूडचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रचंड गाजला. अल्लू अर्जुनने यामध्ये महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. इतकेच नाही तर त्याने थेट राष्ट्रीय पुरस्कारालादेखील गवसणी घातली. पुरस्कार मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षाने अल्लू अर्जुनने सांगितले की, जेव्हा त्याला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तो दु:खी होता.
मुलाखतीमध्ये NBK ने अल्लू अर्जुनला म्हटले, “तेलुगू सिनेविश्वात पहिल्यांदाच एका अभिनेत्याला सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तू म्हटला होतास की, आम्ही व्यावसायिक चित्रपटासाठी राष्ट्रीय स्थरावरील मान मिळवू आणि तू हे करूनही दाखवले, तर आता तुला यावर काय वाटते?” या प्रश्नाचे उत्तर देताना अल्लू अर्जुन म्हणाला की, एकदा मी राष्ट्रीय पुरस्कारांची यादी पाहत होतो, तेव्हा मला त्यात एकही तेलुगू नाव दिसले नाही. यात फक्त नागार्जुन सरांचे नाव होते. मात्र तेदेखील एका विशेष भूमिकेसाठी होते. सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारे कोणीही नव्हते. ही गोष्ट माझ्या मनात राहिली.”
” मी यावर विचार करत होतो. तेलुगूमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. मात्र अद्याप हा पुरस्कार का मिळाला नाही? त्यांची पिढी यात मागे कशी राहिली? या प्रश्नांनी माझ्या मनात घर केले होते”, असे अल्लू अर्जुनने आपल्या मुलाखतीत सांगितले.
पुरस्कार मिळाला तेव्हा मी दु:खी होतो
अल्लू अर्जुनने पुढे सांगितले की, ” जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मी आनंदी होण्याऐवजी दु:खी होतो. माझ्या मनात सतत एक गोष्ट फिरत होती ती म्हणजे, हा पुरस्कार जिंकण्यासाठी तेलुगू कलाकारांना इतका उशिर का झाला.”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा