रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कॉंस्टेबल श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांना उंच उडी मध्ये कांस्यपदक!!
रत्नागिरी चा दिल्ली मध्ये डंका!!!
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कॉंस्टेबल श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांना उंच उडी मध्ये कांस्यपदक!!
“७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा” मध्ये रत्नागिरी पोलीस दलातील “महिला पोलीस कॉंस्टेबल श्रीमती. शीतल पिंजरे” यांनी प्राप्त केले “कांस्य पदक”.
दिनांक ०९/११/२०२४ ते दि. १४/११/२०२४ या कालावधी मध्ये “७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा” नवी दिल्ली येथे पार पडली.
या स्पर्धे मध्ये संपूर्ण भारतातून एकूण ४० विविध पोलीस दलातील संघांनी भाग घेतला होता.
या मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा देखील सहभाग होता.
७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धे मधील “उंच उडी“ या स्पर्धे प्रकारामध्ये रत्नागिरी पोलीस दलाच्या महिला पोलीस कॉंस्टेबल / १३५८ श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे स्पर्धे मध्ये भाग घेतला होता.
पोलीस कॉंस्टेबल / १३५८ श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांनी “उंच उडी“ या स्पर्धे प्रकारामध्ये “1.63 मिटर“ उंच उडी मारून आपले नाव “कांस्य” पदकावर कोरून महाराष्ट्र पोलीस दलाची तसेच रत्नागिरी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
“७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा” मधील पोलीस कॉंस्टेबल / १३५८ श्रीमती. शीतल संभाजी पिंजरे यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. तसेच ₹ १०,०००/- बक्षीस देखील जाहीर केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा