"शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण.", आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी 'मातोश्री'वर काय घडलं?
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
"शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण.", आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी 'मातोश्री'वर काय घडलं?
“नारायण राणे यांना ओळखण्यात आमचा पक्ष (शिवसेना) व वरिष्ठांची चूक झाली. तशीच चूक या ४० गद्दारांच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षातील लोक) बाबतीतही घडली. आजच्या घडीला तिकडचे (शिंदेंची शिवसेना) काहीजण परत येऊ इच्छितात.
परंतु, आम्ही त्यांना परत येण्याचा विचार सोडून द्या असं स्पष्टपणे सांगितलं आहे”, असं वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे) आमदार व वरळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
ते म्हणाले, “या विधानसभा निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तिकडच्या काही लोकांनी शिवसेनेत (ठाकरे) परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला”.*
आदित्य ठाकरे ‘दी लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आठ जणांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या आठ जणांमध्ये दोन वरिष्ठ मंत्री देखील होते. त्यांना परत यायचं होतं. त्यांना आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवायची होती. ते आम्हाला म्हणाले, तुम्ही साहेबांना (उद्धव ठाकरे) विचारा, आम्ही इथे बंडाची घोषणा करतो, मोठं बंड करू, मग माफी मागू आणि त्यानंतर पक्षात परत येऊ, अशी त्यांनी योजना बनवली होती. मात्र, आम्ही त्यांना नकार कळवला”.
*आदित्य ठाकरे काय म्हणाले?*
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्यात होतात, आमच्याबरोबर असताना आमच्यासाठी ठीक होतात, आता तुम्ही त्यांच्याबरोबर गेलेले आहात, आम्ही तुमचं चारित्र्य पाहिलं आहे. तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करत आहात, तिथे आम्ही जिंकू किंवा हरू, आम्हाला त्याची पर्वा नाही.
परंतु, आम्ही तुम्हाला परत घेऊ शकत नाही. भले आम्ही त्या मतदारसंघांमध्ये पराभूत झालो तरी चालेल, तरी आम्ही तुम्हाला परत घेणार नाही”.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मला या लोकांबद्दल, नारायण राणे, मनसे किंवा या गद्दारांबद्दल बोलण्यात फार रस वाटत नाही. हा वेळेचा दुरुपयोग वाटतो. मला त्यांच्याशी वाद घालायला देखील आवडत नाही.
आपल्या देशात राजकारण्यांचा सर्वाधिक वेळ कुठे जात असेल तर तो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, टीकाटिप्पणी करण्यात जातो. मला त्यात पडायचं नाही. माझ्या मनात कोणाबद्दलही चिड नाही”.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment