*मुंबईत महिला पायलटची गळफास घेत आत्महत्या; एकाला अटक*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*मुंबईत महिला पायलटची गळफास घेत आत्महत्या; एकाला अटक*

 मरोळ परिसरातील कनकिया रेन फॉरेस्ट इमारतीत राहणाऱ्या एअर इंडियाच्या 25 वर्षीय एका महिला पायलटनं राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.   सृष्टी तुली असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

तुलीच्या एका नातेवाईकाने केलेल्या तक्रारीप्रमाणे तिचा छळ, गैरवर्तन केल्याचा आणि तिला मांसाहार बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मंगळवारी तिचा प्रियकर आदित्य पंडित (२७) याला ताब्यात घेतलं, असं अधिकाऱ्यानं एफआयआरचा हवाला देऊन सांगितलं. 

पवई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तुली ही उत्तर प्रदेशातील असून ती गेल्यावर्षी जूनपासून मुंबईत कामानिमित्त राहात होती. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत कमर्शिअल पायलट कोर्स करत असताना तिची आणि पंडितची भेट झाली होती आणि ते रिलेशनशिपमध्ये आले होते.

पंडित कारनं दिल्लीला जायला निघाला त्यानंतर ही आत्महत्या उघडकीस आली. गाडी चालवत असताना तुलीने पंडितला फोन करून आयुष्य संपवणार असल्याचं सांगितलं. पंडितनं त्वरीत मुंबईत धाव घेतली आणि तिने फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर त्याने चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला आणि घरात त्याला तुली लटकलेली दिसली. तिला सेव्हनहिल्स रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

तुलीच्या काकांनी नंतर पोलिसांकडे तक्रार केली की, पंडित तिला अनेकदा त्रास देत असे आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा अपमानही करत असे. याशिवाय, त्याने तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता, असा दावा केला. काकांच्या तक्रारीच्या आधारे, पंडितला भारतीय न्याय संहित कलम 108 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असं पोलिसांनी सांगितले.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या