*मणिपूरमध्ये 6 जणांच्या हत्येनंतर हिंसाचार भडकला! 7 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*मणिपूरमध्ये 6 जणांच्या हत्येनंतर हिंसाचार भडकला! 7 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू!!*

  मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात सहा जणांच्या हत्येनंतर राज्याची राजधानी इंफाळमध्ये तणाव वाढला आहे. वाढत्या तणावादरम्यान हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. आंदोलकांनी इम्फाळमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरात घुसून त्यांच्याविरोधात न्यायाची मागणी केली. ही तणावाची परिस्थिती पाहता इंफाळमध्ये शनिवारी संचारबंदी जाहीर करण्यात आली. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.*

जिरीबाम येथून सोमवारी बेपत्ता झालेल्या सहा जणांचे मृतदेह जिरी नदीत तरंगताना आढळून आले. या घटनेनंतर मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये तिव्र निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांना हिंसक वळण लागले. यात इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट बंद करण्यात आले. इम्फाळ खोऱ्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची नोंद झाली आहे. हिंसक जमावाने अनेक आमदारांच्या घरांवर हल्ला केला असून मालमत्तेची नासधूस केल्याचे समोर आले आहे.

इम्फाळ पश्चिम जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी किरणकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शनिवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली. गृह मंत्रालयाने सुरक्षा दलांना शांतता राखण्याचे निर्देश दिले असून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून इम्फाळ खोऱ्यातील डोंगराळ भागातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

शनिवारी पहाटे 4:30 वाजल्यापासून इंफाळ पश्चिम जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला, जो पुढील आदेशापर्यंत सुरू राहील. यापूर्वी 15 नोव्हेंबरच्या कर्फ्यूमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आला होता, ज्यामध्ये 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत कर्फ्यू शिथिल करण्यात आला होता, मात्र आता तो तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.

केवळ आरोग्य, वीज, अन्न पुरवठा, पेट्रोल पंप, नगरपालिका, प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यायालये आणि विमानतळावर प्रवास करणारे प्रवासी यासारख्या अत्यावश्यक सेवांना कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे.
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या