माजी उपसभापती सौं.सोनाली kankadlwarयांची, अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध बतकाम्मा मंडळास भेटी

*माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध बतकम्मा मंडळला दिली भेट!*

"बतकाम्मा"तेलंगणा राज्यातील संस्कृतीशी जोडलेल्या बतकम्मा उत्सवाची परंपरा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील महिला जोपासत आहेत.पित्रूमोक्षा अमावास्येला सुरू होणार्‍या या सणाची दसऱ्याच्या आदल्या दिवशी सांगता केली जाते.हा सण काकतीया साम्राज्याच्या कालावधीपासून तेलंगणात मोठ्या उत्साहात साजरा करतात.बतकम्मा उत्सवादरम्यान बांबूच्या परडी वर विविध प्रकारची फुले ठेवून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला जातो.सजविलेल्या फुलांना बतकम्मा म्हणतात.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील दरवर्षी प्रमाणे"या"वर्षी सुद्धा बतकाम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी सद्दूला बतकाम्मा उत्सवाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट घेऊन बतकम्मा व शारदा माताचे पूजन केले.ह्यावेळी मंडळाने सोनालीताई यांचे स्वागत केले.ह्यावेळी नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सोनालीताई सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments