*वक्फ विधेयकावरील JPC बैठकीत गोंधळ, खासदारानं टेबलावर आदळली बाटली, बोटाला दुखापत!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*वक्फ विधेयकावरील JPC बैठकीत गोंधळ, खासदारानं टेबलावर आदळली बाटली, बोटाला दुखापत!*
वक्फ संशोधन विधेयकासाठी (Waqf Amendment Bill) स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत जोरदार गोंधळ झाला. भाजपा खासदार अभिजीत गांगुली आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्य़ाण बॅनर्जी यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की बॅनर्जी यांनी टेबलावर पाण्याची बाटली फोडली.
बॅनर्जी यांनी ही बाटली समितीचे अध्यक्ष जगदंबीका पाल यांच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न केला, असा दावा काही सदस्यांनी केला आहे.*
*नेमकं काय घडलं?*
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कल्याण बॅनर्जी त्यांचा क्रम नसतानाही मत मांडण्याचा प्रयत्न करत होते. ते यापूर्वी देखील तीन वेळा बोलले होते. तसंच त्यांना प्रेझेंटेशनच्या दरम्यानही बोलायचं होतं.
भाजपा खासदार अभिजीत गांगुली यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी काचेची बाटली फोडली. त्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली.
या प्रकारानंतर बैठक काही काळ स्थगित करण्यात आली. त्यानंतर बॅनर्जी यांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना या प्रकरणात अनियंत्रित वागण्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
त्यांना वक्फ विधेयकाबाबतच्या संयुक्त संसदीय समितीच्या एका बैठकीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना निलंबित करण्यासाठी मतदान झालं. त्यानंतर नियम 374 नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार बॅनर्जी यांनी पाण्याची बाटली अध्यक्षाच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यांनी रागानं ती बाटली तिथंच आदळली. त्यामुळे बॅनर्जी यांच्या हाताला दुखापत झाली.
*यापूर्वी देखील झाला होता वाद*
कल्याण बॅनर्जी आणि अभिजित गांगुली यांच्यामध्ये गेल्या बैठकीमध्येही जोरदार वाद झाला होता. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये दोघांनी एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपशब्दाचा वापर केला होता.
केंद्र सरकारनं 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत वक्फ(संशोधन) विधेयक 2024 सादर केले.
त्यानंतर हे विधेयक संयुक्त समितीकडं सोपवण्यात यावं ही खासदारांची मागणी सरकारनं मान्य केली. त्यानंतर संयुक्त समितीकडं हे विधेयक पाठवण्यात आलं आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा