*कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर*


*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          

*कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर*

वारकरी मतदानाला मुकण्याची शक्यता, मतदानाच्या टक्केवारीत येणार घट


संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात कार्तिकी यात्रा ही कार्तिक वद्य अष्टमी दि. २३ नोव्हेंबर ते अमावास्या दि. १ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर असणार आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला लाखो वारकरी मुकणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

अष्टमीला गुरुवर्य हैबतबाबा पायरीपूजनाने कार्तिक यात्रेला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या सुमारे १० दिवस ते १५ दिवस अगोदरच आपल्या गावावरून निघत असतात. विशेषतः मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या लवकर प्रस्थान करत असतात. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवशी शेकडो दिंड्यांतील लाखो वारकरी आळंदीकडे येत असतील. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना आपल्या हक्काच्या मतांवर पाणी सोडावे लागणार आहे.

दिंड्यांचे प्रस्थान परंपरेनुसार तिथीनुसार होत असते, त्यात बदल होत नाही. त्यामुळे वारकरी मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. परिणामी, मतदानाच्या टक्केवारीत घट होणार आहे. एकंदरीत, राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना राज्यातील सर्वांत मोठी भरणारी आळंदीतील कार्तिकी यात्रा लक्षात घेतली की नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

*असा असणार दिंड्यांचा प्रवास*
कार्तिकी यात्रेच्या आठवडाभरापूर्वी म्हणजे दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान दिनांकापूर्वी निघालेल्या मराठवाड्यातील दिंड्या सप्तमीला दि. २२ नोव्हेंबर रोजी आणि पंढरपूरच्या दिंड्या अष्टमीला दि. २३ नोव्हेंबरला आळंदीत पोहचतील. तर, नवमी दि. २४ आणि दशमी दि. २५ नोव्हेंबरला  मुंबई परिसरातील दिंड्या येतील. या सर्व दिंड्या मतदानादिवशी वाटेत असणार आहेत, तर संत नामदेवराय आणि पांडुरंग पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथे मुक्कामी असणार आहेत.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org