*'...म्हणून महाराष्ट्रात लवकर आचारसंहिता लागणार नाही!'; आदित्य ठाकरेंचं धक्कादायक विधान!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*'...म्हणून महाराष्ट्रात लवकर आचारसंहिता लागणार नाही!'; आदित्य ठाकरेंचं धक्कादायक विधान!*
एकीकडे महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
यातच आता माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रात लवकर आचारसंहिता लागणार नाही असा दावा केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर शनिवारी (ता.12) संपन्न झाला. या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच आदित्य ठाकरे बोलले. यावेळी सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.
ते म्हणाले, आगामी विधानसभेची लढाई महत्त्वाची लढाई आहे. दोन वर्ष आपण ज्या क्षणाची वाट बघतो आहे. तो क्षण लवकर येणार आहे.
लवकरच राज्याची निवडणूक जाहीर होणार आहे. पण जोपर्यंत अदानींचे सगळे काम होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
ठाकरे म्हणाले, आम्ही दावोसमध्ये गेलो होतो.त्यावेळी 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती. मात्र, शिंदे सरकारने 24 तासांत 40 कोटी उधळले. प्रत्येक गोष्टीत यांनी घोटाळा केला आहे. त्याच्या फाईल पडल्या आहेत.
आपलं सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल आपण काढणार आहोत. अधिकारी असो किंवा राजकारणी ज्यांनी लूट केली त्यांना आत टाकणार आहे. महाराष्ट्र तुम्हाला शिक्षा देणार असल्याचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. लूट केली त्यांना आत टाकणार असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी स्वत:साठी खोके,राज्याला धोके असा मिंधे सरकारचा कारभार आहे असा आरोपही केला.
हे सरकार एवढ्यावरच थांबले नाही तर जिथे तिथे भ्रष्टाचार सुरू आहे. पण आता ही लढाई महत्त्वाची आहे. ही लढाई वैयक्तिक नाही, तर महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी असणार आहे.
मुंबईला अदानीच्या घशात घालू द्यायचं का याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे.अनेक प्रकल्प मित्रांना वाटप करणं सुरू आहे.
ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची आहे,असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला.
आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यात पहिल्यांदा भाषण करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले, मनात अनेक आठवणी आहेत. लहाणपणी वर्षांतला मोठा दिवस म्हणजे दसरा असायचा. लहानपणी मी बाळासाहेबांचे भाषण ऐकण्याचं काम केलं. बाळासाहेबांनी याच मैदानात माझ्या हातात तलवार दिली होती. हा त्यांचा आशीर्वाद समजतो.
या मेळाव्यात अनेक भाषणं पाहिली आहे, पण 14 वर्षांत मी कधीही भाषण केलं नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, मी उद्धव ठाकरे आले की भाषण करणार नाही
कारण आमच्या घरात वडिलांसमोर कोणी भाषण करत नाही.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment