*सुमन विद्यालय टेरव येथे शैक्षणिक साहित्य वितरण.**सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम.*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*सुमन विद्यालय टेरव येथे शैक्षणिक साहित्य वितरण.*
*सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम.*
चिपळूण:- डॅम कॅपिटल या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने सुमन विद्यालय टेरव शाळेतील इ. ८ वी ते १० वीच्या १०७ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, आलेख वही तसेच आठ लाँग नोटबुक इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
सेवा सहयोग फाउंडेशनचा नुकताच पंधरावा वर्धापन दिन संपन्न झाला. शिक्षण, महिला सक्षमीकरण, ग्राम विकास व पर्यावरण या मुद्द्यांवर काम करण्याची आवश्यकता ओळखून मुंबई व पुण्यातील काही ध्येयवादी व्यक्तींनी एकत्र येऊन ३१ ऑगस्ट २००९ रोजी या संस्थेची स्थापना करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सदर संस्थेची मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे बोईसर व बदलापूर येथे कार्यालय आहेत. समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हा मुख्य उद्देश असून या संस्थेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र, ओरिसा, गोवा, जम्मू काश्मीरसह इतर राज्यातील ७५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शैक्षणिक साहित्य मिळाल्यास त्यांना शाळेत जाण्यास प्रोत्सान आणि प्रेरणा मिळेल तसेच गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल तरी समाजातील दानशूर समाज प्रेमींनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करावा अशी आव्हान सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सर्वश्री दशरथ कदम, अजित कदम, सुधाकर कदम तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मंदार सुर्वे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात डॅम कॅपिटल या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री अमोल टाकळे यांनी केले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा