डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार!

पुणे :-- यंदा मान्सून राज्यातून दरवर्षीच्या तुलनेत लवकर माघारी परतणार आहे. मात्र त्यापाठोपाठ अवकाळी पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम थेट डिसेंबरपर्यंत राहणार असून ११५ टक्के बरसण्याचा अंदाज आहे. 

  हा अवकाळी पाऊस ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याचे कारण ला-निना तटस्थ अवस्थेतून सक्रिय अवस्थेकडे जात आहे. दरवर्षी मान्सून राज्यातून साधारणपणे ५ किंवा ६ ऑक्टोबरला निघतो.*

तो १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत बरसून मग पुढे दक्षिण भारतात जातो. त्यानंतर पावसाचा मोठा खंड असतो. नोव्हेंबरमध्ये दिवाळीत बहुतांशवेळा हलक्या सरी पडतात. मात्र, हा पाऊस साधारण ३० ते ५० मि.मी. इतका असतो. यंदा मान्सून परतल्यावर लगेच अवकाळी पाऊस सुरू होत आहे.

*ऑक्टोबर-डिसेंबर ११५ टक्के पाऊस*

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून राज्यातून दक्षिण भारतात जाण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पूर्णपणे जाईल, असा अंदाज आहे. 

त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे.

   त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही कमी दाबाचे पट्टे तयार होऊन अधूनमधून अवकाळी पाऊस पडेल. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या मान्सुनोत्तर (अवकाळी) पावसाचे प्रमाण ११५ टक्के राहणार आहे.

*राज्यात ४८ तासांत परतीच्या पावसाला सुरुवात*

गेल्या २४ तासांत मान्सून राजस्थानातील बहुतांश भागासह जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्राच्या काही भागांतून परतण्यास सुरुवात झाली आहे. 

आगामी ४८ ते ७२ तासांत राज्यात परतीचा मान्सून बरसण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments