*निवडणुकीच्या तोंडावर राजापूरात गोवा बनावटीच्या दारुचा महापूर*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*निवडणुकीच्या तोंडावर राजापूरात गोवा बनावटीच्या दारुचा महापूर*
राजापूर एस टी आगारासमोर ८० लाख तर अणुस्कुरा घाटात २७ हाजाराचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर बस स्थानकासमोर मोठी कारवाई करताना एका आयशर टेम्पो मधील सुमारे ८० लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडून काही तास उलटत नाहीत तोच आज सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान राजापूर मतदार संघातील स्थिर सर्वेक्षण पथकाने अनुस्कुरा घाटात दहा लाख रुपये किमतीच्या इनोवा गाडीसह सुमारे २७ हजार ६४० किमतीची गोवा बनावटीच्या विदेशी दारू पकडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरीफ सलीम शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ )(ई )नुसार गुन्हा दाखल केला आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघातील नियुक्ती करण्यात आलेले स्थिर सर्वेक्षण पथक बुधवारी अणूस्कुरा घाटात आपल्या ड्युटीवर कार्यरत होते. त्यावेळी त्या पथकाचे प्रमुख रामेश्वर दत्तू शेट्ये, राजापूर पोलीस उपनिरीक्षक एम. शेख, रायपाटण पोलीस दुरक्षेत्रचे अंमलदार के. आर. तळेकर, त्यांचे पोलीस कर्मचारी आर. बी. पाटील, बी. आय. कोळी, स्वप्निल घाडगे,फोटोग्राफर प्रसाद दादेश पाटील आदी उपस्थित होते. सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान सिल्वर रंगाची टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी क्र. एम. एच. ०६, बी. एम. २१७६ पाचल कडून अणूस्कुराकडे चालली होती. सदर गाडी अणूस्कुरा घाटात वर्दीवर असलेल्या भरारी पथकाने थांबविली आणि तिची तपासणी केली असता त्या गाडीच्या पाठीमागील डिकी मध्ये एका पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या तीन बाटल्या व दोन बिअरच्या बाटल्या असा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. सुमारे २७ हजार ६४० किमतीचा मुद्देमाल आणि दहा लाख रुपये किमतीची टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी पथकाने जप्त केला आहे.
या प्रकरणी इनोव्हा चालक आरिफ सलीम शेख, वय ४० याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ )(ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा