भाग्यश्रीताई आत्राम यांचा भामरागड तहसील कार्यालयावर मोर्चा
**भाग्यश्रीताई आत्राम यांचा भामरागड येथील तहसील कार्यालयावर विविध मागण्यांना घेऊन धडक मोर्चा.*
*हजारोंच्या संख्येने शामिल झाले आदिवासी बांधव.*
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गडचिरोली जिल्ह्याची होत असलेली पिळवणूक व आदिवासिंवर होत असलेला अन्याय, अत्याचार तसेच जिल्ह्यात आलेल्या सुरजागड सारख्या प्रकल्पामूळे जिल्ह्याची कधी न भरून काढणारी होत असलेली नुकसान डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी आज तालुक्यातील हजारो लोकांच्या सोबतीने आपल्या आदिवासीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरत आज दिनांक 08/10/2024 ला तहसील कार्यालय भामरागड येथे भव्य दिव्य असा धडक मोर्चा घेऊन या मोर्च्याच्या माध्यमातून राज्यसरकारला जिल्ह्यातील विविध मागण्यांचा निवेदन तहसीलदार साहेब यांना दिला.यात आदिवासीमध्ये धनगर समाजाची होत असलेली घुसघोरी थांबावून समजला न्याय द्यावे, आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या पट्ट्यांचा मार्ग लौकरत लवूकर मोकळा करावा,स्थानिकांना रोजगार देणे , सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे, पेसा भरती पुरवरत सुरु करण्यात यावी , तसेच सुरजागडची खान बंद करण्यात यावी ,या सर्व विषयांचा यात समावेश होता. यावेळी ताई जनसमुदायन्ना संबोधित करतांना आदिवासीचा हक्क हा आदिवासीचा आहे. यात गाल बोट लावले तर समाजासाठी रस्यावर उतरेल असा सरकारला इशारा दिला.यावेळी मार्गदर्शन करतांना आदिवासी समजसेवक रुषिदादा पोरतेट, प्रा. नाना पेंदाम,जयरुद्दीन भैया हकीम, प्रा. उमेशजी कोरेत, सल्लय्या कंबलवार, उपस्थित होते. व मोठ्या संख्येने आदिवासी बंधू आणि भगिनी आपल्या न्याय हक्कासाठी या मोर्च्यात हजारोच्या संख्येने उपस्थित होते. व आपण एक असल्याचा या खोके सरकारच्या निर्दर्शनात आणून दिले.
Comments
Post a Comment